नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित उत्पादन शुल्कप्रकरणी अटक केल्यानंतर आता आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिहं यांना ईडीने अटक केली आहे. या अटकेमुळे राजकारण तापले असून या कारवाईचा जोरदार विरोध केला जात आहे.
दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये मिळालेले यश पाहता आम आदमी पार्टीने राष्ट्रीय राजकारणात येण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे आपला रोखण्यासाठी त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यावर कारवाई संकट ओढवले आहे. याचा थेट परिणाम आपवर होणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्यसभेचे खा. संजय सिहं हे प्रमुख नेते होते. तर अगोदर अटक झालेले सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, अर्थ, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह अशी एकूण अठरा वेगवेगळी खाती होती. त्यातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आप सरकारने चांगले कार्य केले आहे. या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीचे कौतुकही होत आहे. या पार्श्वभूमीवर सिसोदियांवरील कारवाई केली होती. त्यानंतर आता खा. संजय सिंह यांना अटक केली आहे.