लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा लासलगाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात साकारला जाणार असून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या लासलगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असावा अशी मागणी लासलगाव करा तर्फे वेळोवेळी केली गेली आहे. लासलगाव ग्रामपंचायतच्या प्रांगणात पुरेशी जागा असल्याने या जागेत भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे नुकताच पाठविण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे त्या ठिकाणी भव्य चौथारा उभारला जाणारा सून शिवकाली आठवणींना उजाळा मिळणारे देखावे त्यावर सादर केले जाणार आहेत.
निफाड तालुक्यातील सर्वात उंच व मोठा पुतळा लासलगाव शहरात उभारला जाणार आहे .परिसराचे सुशोभीकरण केले जाणार असून आकर्षक विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्याचा मानस ग्रामपंचायतीचा आहे. शासनाकडून याबाबत परवानगी मिळतात तातडीने या ठिकाणी काम सुरू केले जाणार असल्याची माहिती होळकर यांनी दिली आहे.