नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळासाठी तयार करण्यात आलेल्या समितीत नामदार गिरीश महाजन यांचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी गिरीश महाजन यांची विधिमंडळ परिसरात भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहराने विकास केलेला आहे. मागील सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे नियोजित करण्याचा अनुभव गिरीश महाजन यांच्याकडे आहे.
या अनुभवामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातील कुंभमेळा निश्चितपणे यशस्वी होईल व नाशिक शहराचा विकास देखील त्यानिमित्ताने साधला जाईल असा आशावाद आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेविका स्वाती भामरे व रोहिणी नायडू यादेखील उपस्थित होत्या.