नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवाा) – नाशिक महानगरपालिका क्षेत्राच्या दोन किलोमीटर अंतरापर्यंत असणाऱ्या fringe एरिया रस्ते विकसित करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना उपलब्ध केली होती. लक्षवेधी सूचना सादर करताना पुणे महानगरपालिका परिक्षेत्राचा विकास करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले साधारणता त्याच वेळेस म्हणजे २०१७ साली नाशिक प्रदेश विकास प्राधिकरण देखील स्थापन करण्यात आले. परंतु नाशिक जिल्ह्याचा हवा तसा विकास होऊ शकला नाही, याबाबत खंत व्यक्त करताना याचे कारण नाशिक विकास प्राधिकरण योग्य प्रकाराने कार्यरत नसणे हे असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केले.
२०१७ साली स्थापन होऊन देखील अद्याप नाशिक परिमंडळाचा विकास आराखडा देखील तयार नसल्याची बाब आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केली. याबाबत उत्तर देताना विकास योजना तयार करण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला असून त्या त्वरित मंजूर देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने उत्तर देताना उदय सावंत यांनी दिले. तसेच नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा होत असून बाह्य रिंग रोडचे काम वेगाने करण्याची आवश्यकता असल्याची मागणी देखील आमदार देवयानी फरांदे यांनी केली.
यासाठी जलालपूर शिवारातील चार किलोमीटर रस्ता हा या रिंग रोडसाठी आरक्षित करणे गरजेचे असल्याची बाब आमदार देवयानी फरांदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली . नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीपासून साधारण दोन किलोमीटर अंतरातील क्षेत्राकरिता प्रस्तावित रस्त्याची संरचना प्रस्ताव नाशिक प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केल्याची माहिती देत या प्रस्तावास शासनाकडून त्वरित मान्यता देण्यात येईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांच्या वतीने उदय सामंत यांनी दिले.
नाशिक शहरातील रिंग रोड साठीचा रस्ता संपादित करण्यासाठी प्रोत्साहनात्मक टीडीआर देण्याची मागणी करतानाच याबाबत देखील प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेने सादर केला असल्याचे सांगून सदर टीडीआर देण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. तसेच नाशिक विकास प्राधिकरणाला निधी देणे गरजेचे असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले. नाशिक प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे सक्षम कर्मचारी नसल्यामुळे आकृतीबंधाप्रमाणे कर्मचारी देण्याची मागणी देखील आमदार देवयानी फरांदे यांनी केली.
सिंहस्थ कुंभमेळा हा नगरी नाशिक नगरी साठी ग्लोबल इव्हेंट असून संपूर्ण देशातून भाविक व पर्यटक यासाठी नाशिक शहरात येतात याकरता शहरावरून येणाऱ्या वाहतुकीसाठी वळण रस्त्याची आखणी व बांधणी करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करतानाच हा रस्ता प्राधान्याने करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन केले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने ना. उदय सावंत यांनी दिले.