इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जयपूरः पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले भजनलाल शर्मा यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता शर्मा हे राजस्थानचे नवे प्रमुख असतील. भजनलाल शर्मा यांच्याशिवाय दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
गेल्या मंगळवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी आणि दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड केली होती. आज, शुक्रवारी शपथविधी सोहळ्याने त्यांची औपचारिकता पूर्ण झाली असून राज्याला नवे सरकार मिळाले आहे.
मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार आहेत. या निवडणुकीत भाजपने १९९ पैकी ११५ जागा जिंकल्या. काँग्रेस पक्ष ६९ जागांवर घसरला. तेव्हापासून भाजप राज्यातील दिग्गजांपैकी कुणाला तरी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करेल, अशी अटकळ बांधली जात होती; मात्र भाजपने नव्या चेहऱ्यांवर डाव खेळला आणि राजस्थानमध्ये तब्बल ३३ वर्षांनंतर ब्राह्मण समाजातील एका नेत्याची मुख्यमंत्रिपदी निवड केली.