नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ओमसाई पेट्रोल पंप परिसरातील उड्डाणपूलावर कार अपघातात चालकाचा मृत्यू झाला. राजेंद्र कट्टरसिंग बागुल (५२ रा.देवळाली कॅम्प) असे मृत कार चालकाचे नाव आहे. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बागुल सोमवारी पिंपळगावकडून नाशिकच्या दिशेने आपल्या चारचाकीतून प्रवास करीत असतांना ओमसाई पेट्रोल पंप परिसरातील आडगाव ब्रिजवर कारचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
जखमी अवस्थेत त्यांना नजीकच्या अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. गुरूवारी (दि.१४) उपचार सुरू असतांना डॉ. अतुल सांगळे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.