नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे होमेथॉन २०२३ प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून २१ ते २५ डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित या प्रदर्शनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री दादा भुसे यांची नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वय जयेश ठक्कर, सह समन्वयक शंतनू देशपांडे यांनी नागपूर येथे भेट घेऊन उदघाटन सोहळयाचे निमंत्रण दिले. नाशिकच्या शहराच्या विकासासाठी नरेडकोचे संपूर्ण सहकार्य असेल असे आश्वासनही यावेळी पदाधिकार्यांनी दिले.
गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदान येथे २१ ते २५ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. या सोहळयास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी आश्वस्थ केले. मुंबई पुण्यानंतर नाशिकचा विकास जोमाने होत आहे.
या विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांची मोठी जवाबदारी असून या व्यवसायिकांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले या प्रसंगी पालकमंत्री दादा भुसे ,आमदार देवयानी फरांदे,आमदार सीमा हिरे, होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वय जयेश ठक्कर, सह समन्वयक शंतनू देशपांडे, अनिल भालेराव, अनिल जाधव उपस्थित होते.