सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील बस स्थानकात शिवशाही बसने तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. पालघर शिर्डी शिवशाही बसखली येवून या तरुणाचा मृत्यू झाला. विजय नामदेव मोरे (४२, रा. सातपीरगल्ली, सिन्नर) असे मृताचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. मोरे याच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. पालघर डेपोची शिर्डी-पालघर ही शिवशाही बस (एमएच. ०९- सीएम.९५८७) शुक्रवारी सकाळी शिर्डीहून आल्यानंतर बसस्थानकात जात असताना ही घटना घडली.
असा झाला अपघात
सकाळी मोरे हा बसस्थानकातून पायी बाहेर जात असतांना अचानक बस आली. त्यावेळी बसच्या चाकाखाली तो सापडला. ही घटना घडल्यानंतर चालक जगदीश पिताबर पाटील (३८, रा. पालघर) यांनी तात्काळ बस थांबवली. पण, मोरे याच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्याचा मृत्यू जागीच झाला.