मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याच्या विविध प्रश्नांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी आज राज्याचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार होते. या भेटीत राज्याच्या विविध विषयाचा पाठपुरावा करण्यात येणार होता. पण, आता ही भेट रद्द झाली असून सोमवारी किंवा मंगळवारी आता ही भेट होणार आहे.
कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात ही भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांबरोबर होती. पण, ही भेट आता लांबणीवर पडली आहे.
या भेटीवर ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी चिमटा काढला असून त्यांनी संसदेची सुरक्षा बघायला ते येणार असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी दिल्ली – मुंबई पास काढल्याचा चिमटाही घेतला आहे. या शिष्टमंडळाच्या भेटीअगोदर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे अमित शाह यांची भेट घेणार आहे. या भेटीत ते राज्याच्या इथेनॅाल, कांदा प्रश्नांवर चर्चा करणार आहे.