नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील कुकुडणे वन हद्दीत गुजराथ सीमे लगत खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारी जीप गाडी वनविभागाच्या कर्मचा-यांनी शिताफीने ताब्यात घेतली.
या गाडीत आठ खैर लाकडाचे मोठे नग आढळून आले आहे. वनविभागाचे कर्मचारी येताच चालक व तस्कर जीप जागेवरच सोडून फरार झाले. या परिसरात नेहमीच लाकाडाची तस्करी होत असल्याच्या घटना होत असतात. त्यामुळे वनविभागही नेहमीच अलर्ट असते.
कुकुडणे वन हद्दीत गुजराथ सीमे लगत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपी फरार झाले असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.