इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अभिनेता श्रेयस तळपदे हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात तळपदे याला दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शुटिंग सुरू होते. यावेळी सेटवर प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमार सुध्दा बरोबरच होता. पण, शूटिंग संपल्यानंतर घरी गेल्यानंतर श्रेयस बेशुद्ध पडला. नेमकं काय झालं हे कोणालाच कळाले नाही. मला बरं वाटत नसल्याचे त्याने पत्नीला सांगितले. त्यानंतर श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
‘वेलकम टू द जंगल या चित्रपटाचे दिवसभर शुटिंग पूर्ण झाले तोपर्यंत श्रेयसची तब्येत चांगली होती. तो सर्वांशी गप्पा मारत होता. विनोद करत होता. त्यानंतर ही घटना तो घरी जात असतांना झाल्याचे बोलले जात आहे. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात तब्बल २४ अभिनेते असून हा विनोदी चित्रपट असला तरी यात काही अॅक्शन सीन सुध्दा आहे.