नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांती मंदिर या ९५६ दिवसांच्या राज्यव्यापी अभियानांतर्गत पुण्याच्या कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने २००० देशभक्तांना, हुतात्म्यांना सामुदायिकरित्या श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम नाशिकच्या रामतीर्थ, गोदावरी घाटावर १४ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आला.
देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने तसेच नाशिक येथील अॅड. भानुदास शौचे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवंगत स्वातंत्र्यसेनानी, दिवंगत क्रातीकारक ,दिवंगत सैनिक दिवंगत देशभक्त यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून आदर भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी नाशिक सिहस्थ भूमी येथे दक्षिण वाहिनी गोदावरी नदी मातेचे पूजन आणि भारतमाता प्रतिमा पूजन करून दिवांगतांच्या आत्म्यास सद्गगती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
पौरोहित्य पंडीत उपेंद्र (बापू) देव, पंडीत रवींद्र देव यांनी केले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्याय
नवनाथ कांबळे, धनंजय पुजारी, प्रमोद मुळे, पं अलोक गायधनी,पं अभय भगरे, पं विलास गायधनी, पं विवेकानंद घोडके, सुहास गजानन चांद्रत्रे पं अथर्व पाराशरे, पं योगेंद्र पारक्षरे, सौ. अनिता कुलकर्ण , पं क्षेमकल्यानी, श्रीराम शिंपी, गजानन जाधव यावेळी उपस्थित होते.