मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतातील सर्वात अग्रगण्य अन् लोकप्रिय प्रीमियम कार निर्माता कंपनी कियाने आता दुसऱ्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘द न्यू सोनेट’ कार भारतीय बाजारपेठेत उतरवली जात आहे. तंत्रज्ञानस्नेही आणि एकाच ठिकाणी सर्व वैशिष्ट्यांचा अंतर्भाव असलेल्या वाहनांच्या शोधात असलेली आधुनिक जोडपी तसेच व्यावसायिकांना लक्षात घेऊन ही सर्वात भारदस्त आणि स्पोर्टीअर नवी सोनेट डिझाइन करण्यात आली आहे.
या कारमध्ये १० स्वायत्त फीचर्ससह एडीएएस , पुढील भागात धडक होऊ नये म्हणून मदत करणारी यंत्रणा – फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट, लीडिंग व्हेइकल डिपार्चर अलर्ट आणि एकाच लेनमध्ये राहण्यासाठी सहाय्यकारी – लेन फॉलोइंग असिस्ट या वैशिष्ट्यांचा कारमध्ये समावेश करण्यात आला आहे. मजबूत १५ हायसेफ्टी फीचर्सच्या अंतर्भावासोबतच सोनेट आता २५ पेक्षा सुरक्षात्मक वैशिष्ट्यांसोबत येते. या श्रेणीत १५ स्टँडर्ड सुरक्षात्मक वैशिष्ट्यांसह येणारी नवी सोनेट ही एकमेव कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे. इतकेच नव्हे तर, नव्या सोनेटमध्ये या श्रेणीतील १० सर्वोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ड्युअल स्क्रीन कनेक्टेड पॅनल डिझाइन, मागील दारावरील सनशेड कर्टन सर्वच दरवाजांत पॉवर विंडो आहेत, त्याही सुरक्षेसह वन टच ऑटो अप-डाऊनसह. आणि आणखी काही वैशिष्ट्यांचे नाव घ्यायचे म्हटले तर नव्या सोनेटमध्ये विषाणू आणि जीवाणूंपासून सुरक्षेसाठी स्मार्टप्युअर एअर प्युरिफायरही देण्यात आले आहे.
कॅरेन्स आणि श्रेणीत प्रथम सेल्टोसमध्ये या उद्योगातील पहिल्याच ६ स्टँडर्ड एअरबॅग्ज सादर करण्याचा बहुमान पटकावल्यानंतर किया सुरक्षात्मक मापदंडांना पुन्हा नव्याने पारिभाषित करत आहे. एक मानक वैशिष्ट्य म्हणून ६ एअरबॅग्ज देत नव्या सोनेटने कियाचे स्थान आणखीच भरभक्कम केले आहे, जो आपल्या सर्व वाहनांमध्ये ६ ते ८ एअरबॅग्ज देणारा सर्वात युवा ब्रँड ठरला आहे.
किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ताई-जिन पार्क म्हणाले की, “भारतातील आमच्या यशस्वी प्रवासामागे सेल्टोस पाठोपाठ सोनेटचेही एक विशेष स्थान आहे. अभूतपूर्व वैशिष्ट्ये आणि डिझाइनसोबत भारतात सादर झाल्यानंतर सोनेटने आता देशांच्या सरहद्दी पार केल्या आहेत. ही कार आता १०० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जात आहे. सोनेट चालवण्याचा आनंद घेणाऱ्या ३.६८ लाख ग्राहकांची मांदियाळी आम्ही जमवली असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नव्या सोनेटच्या माध्यमातून मूल्याआधारित मालकी अनुभवासोबत तिच्या उच्च दर्जाच्या सुविधांचे सहजपणे एकत्रीकरण करणे हा आमचा उद्देश आहे. यातून मेंटेनन्सवरील कमीत कमी खर्च अन् जास्तीत जास्त पुर्नविक्री मूल्य ग्राहकाला मिळावे, हा हेतू आहे. हे अनोखे कॉम्बिनेशन आधुनिक ग्राहकांच्या व्यापक वर्गाशी मेळ जुळवून घेणारे ठरणार आहे. नवी सोनेट बाजारात उतरवून कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत अग्रगण्य स्थान मिळवण्याचा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे.” ग्राहकाभिमुखतेकडे लक्ष केंद्रीत करत किया इंडियाने डिझेल पॉवरट्रेनसोबत आपल्या सर्व प्रकारांत पुन्हा मॅन्युअल ट्रान्समिशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.