इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत आज नव्याने ५०० इलेक्ट्रीक बस सुरु करण्यात आल्या आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपराज्यपाल विनयकुमार यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम झाला. त्यात या सर्व बसेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
याअगोदर दिल्लीत ८०० इलेक्ट्रीक बस होत्या आता ही संख्या १३०० झाली आहे. २०२५ पर्यंत १० हजार ४८० बस सुरु करण्याचा दिल्ली सरकारचा प्लॅन आहे.
या बस सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, देशातील सर्वाधीक इलेक्ट्रीक बस आता दिल्लीत झाल्या आहे. देशात एवढी मोठी संख्या देशात दिल्लीत आहे.