नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –सध्या सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या कार्यान्वयन तैनातीचा एक भाग म्हणून, आयएनएस कडमट्ट ही फिलिपाईन्स मधील मनिला येथे दाखल झाली आहे. भारत आणि फिलिपाईन्स यांच्यातील सागरी सहकार्य वाढवणे हा या भेटीचा उद्देश आहे.
बंदरांच्या मुक्कामादरम्यान दोन्ही नौदलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये व्यावसायिक संवाद, तज्ञांची देवाणघेवाण आणि परस्पर भेटी यांचा समावेश आहे. परस्पर सहकार्य वाढवणे आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हा याचा उद्देश आहे. या भेटीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या भेटी आणि सामुदायिक संपर्क/सामाजिक प्रभाव आदी उपक्रमांचेही नियोजन केले जात आहे.
मनिलाहून प्रस्थान केल्यानंतर, आयएनएस कडमट्ट आणि फिलीपाईन्स नौदलाची गस्तीनौका बीआरपी रॅमन अल्काराझ यांच्यात दक्षिण चीन समुद्रात संयुक्त सागरी सराव नियोजित आहे.. आयएनएस कडमट्ट ही संपूर्णतः स्वदेशी बनावटीची पाणबुडीविरोधी युद्धनौका असून ती अत्याधुनिक पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे.