नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रेलरला कसारा येथील घाटातुन ईगतपुरीकडे विरुध्द दिशेने जाण्याची मुभा देण्याच्या बदल्यात १५ हजाराची लाच मागणा-या घोटीच्या महामार्ग पोलीस केंद्रातील दोन पोलिस नाईक विरुध्द लाच लुपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कैलास रामदास गोरे व संतोष उत्तम माळोदे असे पोलिस नाईकाचे नाव आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचा ट्रेलर हा मुंबई दिशेकडून इगतपुरी दिशेकडे National highway no. 3 वरून जात असताना सदरील ट्रेलर यास कसारा येथील घाटातून इगतपुरीकडे विरुध्द दिशेने जाण्याची मुभा देवुन सदरील घाट ओलांडून पार करुन देण्याच्या मोबदल्यात पोलिस नाईक कैलास गोरे यांनी पंचांसमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच सदर घाट पार करुन महामार्ग पोलीस केंद्र, घोटी ता. इगतपुरी येथे आल्यावर पोलिस शिपाई संतोष उत्तम माळोदे यांनी तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्विकारण्याचे मान्य केले. दोघांविरुध्द इगतपुरी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ सह भ्रष्टाचार प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचेची मागणी कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष, वय – ३७, रा. पुणे
आलोसे–
१) कैलास रामदास गोरे, पोलीस नाईक, बक्कल क्रमांक ५४४, तत्कालीन नेमणुक महामार्ग पोलीस केंद्र, घोटी.
मुळ नेमणुक नाशिक ग्रामीण.२) संतोष उत्तम माळोदे, पोलीस नाईक, बक्कल क्रमांक २५६६, तत्कालीन नेमणुक महामार्ग पोलीस केंद्र, घोटी.
मुळ नेमणुक नाशिक ग्रामीण.लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- २०,०००/- रुपये तडजोड अंती १५,०००/- रुपये
दिनांक – १९/०५/२०२३
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय असून त्यांचा ट्रेलर हा मुंबई दिशेकडून इगतपुरी दिशेकडे National highway no. 3 वरून जात असताना सदरील ट्रेलर यास कसारा येथील घाटातुन ईगतपुरीकडे विरुध्द दिशेने जाण्याची मुभा देवुन सदरील घाट ओलांडुन / पार करुन देण्याच्या मोबदल्यात आलोसे क्र. १ यांनी पंचांसमक्ष २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली. तसेच सदर घाट पार करुन महामार्ग पोलीस केंद्र, घोटी ता. इगतपुरी येथे आल्यावर आलोसे क्र. २ यांनी तडजोडीअंती १५,०००/- रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्विकारण्याचे मान्य केले. म्हणुन आलोसे क्र. १ व आलोसे क्र. २ यांचेवर इगतपुरी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ सह भ्रष्टाचार प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा अधिकारी
श्रीमती गायत्री जाधव, पोलीस निरिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक*
मो.क्र. 7588516042 तपास अधिकारी –
श्री. संदिप घुगे,
पोलीस निरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.क्र. 8605111234
सापळा पथक–
म पो ह ज्योती शार्दुल
पो.ह. अनिल राठोड
पो.कॉ. नितीन नेटारे
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक