नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इडिया आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खो-खो फेडरेशन च्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथे आयोजित ६७ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेला आजच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने पॉंडीचरी संघावर १ डाव आणि १७ गुण अश्या मोठ्या फरकाने विजय मिळवून आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.
या विजयामुळे महाराष्ट्राच्या संघाचा बाद फेरीतील प्रवास सुकर झाला आहे. “अ” गटातील या साखळी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळतांना नाशिकच्या सरिता दिवा या खेळाडूने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. तीने आपला बचाव करतांना ३.२० मिनिटे आपले संरक्षण केले तर आक्रमणामध्ये तब्बल तीन खेळाडूंना बाद केले. प्रतीक्षा बिरासदार हीने ५.४०मिनिटे नाबाद पळतीचा खेळ केला तर प्रीती धाकरंगेने हो आपला बचाव करतांना ५. ३० मिनिटे चांगले संरक्षण केले. कर्णधार निशा वैजल हिने आक्रमणामध्ये एक खेळाडूला बाद केले. मुलीच्या “इ” गटातील सामन्यत तामिळनाडू संघाने विद्या भरती संघावर एक डाव आहि सात गुणांनी विजय मिळविला, तर “फ” गटात झारखंड संघाने बिहारला एक डाव सात गुणांनी पराभूत केले.
मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या संघाने तामिळनाडू संघावर १७- १० अश्या दहा गुण आणि एक डाव राखून मोठा विजय साजरा केला. यामध्ये महाराष्ट्राकडून अजय कश्यप, (२.५० मिनिटे संरक्षण आणि तीन गाडी बाद),गणेश बोरकर (दोन मिनिटे पळती आणि दोन गाडी बाद), चेतन बीका (२. ३० मिनिटे नाबाद आणि ३.१० मिनिटे बचाव आणि दोन गदी बाद केले आणि आपल्या अष्टपैलू खेळाच्या आधारे महाराष्ट्राला मोठा विजय मिळवून दिला.
मुलांच्या गटात “इ” गटातील साखळी सामन्यात उत्तर प्रदेश संघाने पश्चिम बंगालवर तीन गुणांनी विजय मिळविला, ‘फ”गटात झारखंड संघाने विद्या भरती संघाला चार गुणांनी पराभूत केले तर “जी’ गटात तेलंगणा संघाने बिहारवर एक डाव आणि १३ गुणांनी मोठा विजय मिळवत चांगली कामगिरी केली. “
या स्पर्धेत भारताच्या विविध राज्यांचे २८ संघांचे आठ गटात विभागणी करण्यात आली आहे. या गटवार साखळी सामन्यातील निकालानंतर या आठ गटामधील प्रत्येक गटातून पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या पात्र ठरलेल्या १६ मुलांच्या आणि १६ मुलींच्या संघामध्ये बाद फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत अशी माहिती तांत्रिक समिती प्रमुख प्रेमचंद चौधरी यांनी दिली.
या स्पर्धेला कब्बडीच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा जिजाऊ पुरस्कार प्राप्त शैलजा जैन, सिन्नर नगरपरिषदेचे नगरसेवक रामभाऊ लोणारे, के, के वाघ संस्थेचे क्रीडा संचकाळ एस. एस. ढवळे, नामदेव महात्मे, इचलकरंजी येथील जैन क्रीडा संस्थेचे संचालक अनिल गांजवे, खो-खोच्या राष्ट्रीय खेळाडू आणि संघटक साधना देशमुख या मान्यवरानी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेछया देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला.
या स्पर्धा खो-खो साठी असलेल्या अधितकृ मॅटच्या चार मैदानावर खेळविल्या जात आहेत. मैदान व्यवस्था चोख राखण्यासाठी खो- खो पदाधिकारी मंदार देशमुख जिल्हा सचिव उमेश आटवणे यांच्या मार्गर्दर्शनाखाली सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेची तांत्रिक बाजू पंच प्रमुख प्रेमचंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंच व्यवस्थित पार पंडत आहेत.
या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व्हावे यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, आणि अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, संदीप ढाकणे आणि सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.