नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारतीय रेल्वेचे आकारमान, व्यापकता आणि परिचालनाचे महत्त्व विचारात घेता यामध्ये रिक्त पदे निर्माण होणे आणि ती भरली जाणे सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. नियमित परिचालन कार्य, तंत्रज्ञानातील बदल, यांत्रिकीकरण आणि नवोन्मेषी पद्धती यांना अनुसरून पुरेशा प्रमाणात आणि योग्य प्रकारचे मनुष्यबळ उपलब्ध केले जाते. ही पदे प्राथमिक दृष्ट्या रेल्वेकडून नियुक्ती संस्थांसोबत परिचालन आणि तंत्रज्ञानविषयक गरजांना विचारात घेऊन भरली जातात.रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
अलीकडेच १.३९ लाख बिगर राजपत्रित पदांवर भरती करण्यासाठी दोन प्रमुख स्पर्धात्मक संगणक आधारित परीक्षा घेण्यात आल्या आहेत, ज्या परीक्षांमध्ये २.३७ कोटींपेक्षा जास्त उमेदवार सहभागी झाले होते. गेल्या पाच वर्षात ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २,९४,११५ रिक्त पदांवर भरती करण्यात आली आहे. भरती करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी ९० टक्के उमेदवारांची भरती सुरक्षा आणि परिचालनात्मक श्रेणींमध्ये झाली आहे.
विभागीय रेल्वे, त्यांना असलेल्या अधिकारानुसार सेवेत असलेल्या कर्मचारीवर्गाचा कर्मचारी आढावा प्रक्रिये अंतर्गत ठराविक काळाने आढावा घेते. विभागीय रेल्वेकडून हा आढावा वार्षिक/सहामाही तत्वावर घेतला जातो, म्हणजेच प्रत्येक वर्षी कर्मचारीवर्गाचा आढावा घेतला जातो.
२०१४-१५ ते २०२३-२४ दरम्यान(सप्टेंबर २३ पर्यंत) रेल्वे भरती संस्थांकडून क गटाच्या विविध पदांसाठी( स्तर १ आणि सुरक्षा संबंधित पदे) ४,८९,६९६ उमेदवारांची भरती करण्यात आली आहे.