इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिंडोरी तालुक्यातील बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेला आरोपी उमेश खादवे (३५) हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नाशिकमधून फरार झाला होता. गेल्या चार दिवसापासून त्याचा शोध पोलिस घेत असतांना आज त्याचा मृतदेह त्याच्याच विहिरीत सापडला. त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसापूर्वी पीडित मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत अगोदर सहा पोलिस निलंबीत असतांना हा फरार आरोपीने आत्महत्या केल्याचे समोर आली आहे.
पोलिसांना तुरी देऊन फरार झालेला उमेश खादवे हा पिंपळनेर गावातील ग्रामपंचायत सदस्य होता. एका वीस वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर २७ सप्टेंबरला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दिंडोरी पोलिसांनी त्याला २८ सप्टेंबरला त्र्यंबकेश्वरल घेऊन गेले. त्र्यंबकेश्वरहून परत येत असतांना त्याने नाशिक शहरातील गंगापूर रोडवर लघुशंकेच्या बहाण्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन पळ काढला होता.
एकीकडे पोलिस फरार आरोपीचा शोध घेत असतांना या घटनेत दोन दिवसापूर्वी पीडित मुलींच्या कुटुंबियांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिंडोरी पोलिसांकडे दिली. त्यानंतर तीचा मृतदेह घरा शेजारी सापडला. त्यानंतर आज फरार आरोपीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दिंडोरी पोलीस आणि सरकारवाडा पोलीस अधिक या घटनेचा तपास करत असतांना ही माहिती समोर आली आहे.