भोपाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ते १९ वे मुख्यमंत्री आहेत. भोपाळच्या मोतीलाल नेहरू स्टेडियमवर हा सोहळा केवळ १० मिनिटे चालला. जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी सर्वांना शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि ११ राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्री मोहन यादव उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर ते प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. आज संध्याकाळी पाच वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे.
शपथ घेण्यापूर्वी यादव म्हणाले, ‘मी सर्वांना सोबत घेऊन सुशासनाची खात्री देईन.’ शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘मला विश्वास आहे, की नवे मुख्यमंत्री राज्यातील समृद्धी, विकास आणि लोककल्याण नव्या उंचीवर नेतील. निवडणुकीच्या निकालानंतर आणि नव्या मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या दरम्यान शिवराज यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर ‘राम-राम’ असे लिहिले होते. शपथ घेण्यापूर्वी यादव शपथ घेण्यापूर्वी भोपाळमधील हनुमान मंदिरात गेले. त्यांनी हनुमानाची आरती केली आणि मस्तक टेकवले.