नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी अगोदर फटाके फोडले त्यानंतर घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन जण गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत गेले. नंतर सभागृहात शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व घटनेमुळे संसदेत चर्चा सुरु असतांना मोठा गोंधळ उडाला. यात एक महिला व दुसरा पुरुष असून दोघेही तरुण आहे. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर लोकसभेचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले. या दोघांना पकडण्यात आले आहे.
अगोदर संसदेच्या बाहेर आधी फटाके फोडले. यावेळी त्यांनी भारतमाता की जय, तानाशाही नही चलेगी… आदी घोषणा दिल्या. त्यानंतर दोघे संसदेत पोहचले. नव्या संसदेतील हा पहिलाचा प्रकार असून त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. सुरक्षेचा इतका कडेकोट बंदोबस्त असतांना हे आता कसे शिरले यावर आता प्रश्न विचारला जात आहे.
या दोघांना पकडल्यानंतर त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं जात नाही. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याचे सांगितले. या दोघांना पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. त्यानंतर बरोबर २२ वर्षानंतर ही घटना घडली. हा हल्ला नसला तरी संसदेत थेट शिरणे फटाके फोडणे व घोषणा देणे हे गंभीर आहे.या घटनेत एक तरुण महाराष्ट्रातील असून तो लातूरचा आहे. अमोल शिंदे (२५) असे त्याचे नाव आहे. तर निलम कौर सिंह (४२) ही महिला हरियाणीत असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी या घटनेबाबत सांगितले की, दोन तरुणांनी गॅलरीतून उडी मारून काहीतरी फेकले, त्यामुळे गॅस बाहेर येत होता. त्यांना खासदारांनी पकडले, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. हे निश्चितपणे सुरक्षेचे उल्लंघन आहे…