इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले. अभिनेते लक्ष्मीकांते बेर्डेचे यांचे ते सख्खे बंधू होते. वयाच्या ७८ वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार टाटा रुग्णालयात सुरु होते. दोन दिवसापूर्वीच त्यांना घरी आणले होते. त्यात त्यांना हृदयविकाराच्या झटका आला व त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. नभोवाणी, नाट्यक्षेत्र या क्षेत्रांतील कामाबरोबरच मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभियनाने एक वेगळे स्थान निर्माण केले. ३०० पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमधून तसेच काही हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.
त्यांच्या निधनानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी एक दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना! अशी श्रध्दांजली अर्पण केली.