इंडिय दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रेम एका बरोबर व लग्न दुस-याबरोबर करने एका तरुणाला चांगलेच पडले महागात. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका घटनेत बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला पोलिस ठाण्यात जावे लागले. येथे असं काही घडलं की नव-याला आपले ठरलेले लग्नच रद्द करावे लागले.
आग्रा येथील हिरापर्वत भागात एका लग्नाची जोरदार तयारी सुरु असतांना नवरदेवाची प्रेयसी थेट पोलिसांना भेटली. या प्रेयसीने आपल्या तीन वर्षाच्या प्रेमप्रकरणाची कहाणी सांगितली. त्यात नवरदेवाने दिलेले लग्नाचे आश्वासन तीने सांगत लेखी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला पोलिस ठाण्यात बोलावले. त्याच्याबरोबर त्याचे कुटुंबिय होते. त्यांच्यात मग चर्चा झाली.
या चर्चेतून नवरदेवाने आपल्या प्रेयसीबरोबर लग्न करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या. पण, या सर्व प्रकारामुळे ठरलेले लग्न मात्र मोडले. प्रेम एकाबरोबर व लग्न दुसरीबरोबर करणे या नवरदेवाला चांगलेच महागात पडले. आता जे लग्न ठरले होते त्या वधुने मात्र अद्यापर्यंत तक्रार केलेली नाही. पण, तीचे लग्न जरी मोडले असले तरी ती मात्र असल्या तरुणांबरोबर लग्न करण्यापासून वाचली हे मात्र नक्की….