नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागपूरच्या हिवाळी अधिवेशनचा आज पाचवा दिवस असून विविध विषयावर चर्चा या अधिवेशनात सुरु आहे. पहिल्या दिवशी पाच विधेयक मांडल्यानंतर तसेच विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर विधान सभेचे पहिल्या दिवसाचे कामकाज संपले. त्यानंतर चार दिवस विविध विषयावर चर्चा झाली.
या अधिवेशनात विरोधी आमदारांनी विधिमंडळाच्या पाय-यावर रोज आंदोलन करत लक्ष वेधले. कधी संत्र्यांच्या तर कधी कांद्याच्या माळा गळ्यात घालून विरोधकांनी या प्रश्नाकडे आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी जोरदार घोषणा केल्या. या अधिवेशात विरोधकांनी अगोदरच अनेक मुद्दे उपस्थितीत करणार असल्याचे सांगितले तर सत्ताधारीकडून दिशा सालियान प्रकरणात एसआयटी चौकशीची विषय लावून धरला.
आता विधिमंडळाच्या अधिवेशानत आता उरलेल्या दिवसात कोणत्या प्रश्नांवर चर्चा होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत सरकार काय घोषणा करतात याकडे लक्ष आहे.