इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातर्फे खेळताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय च्या तेवीस वर्षांखालील स्पर्धेत, प्रभावी फलंदाजी केली .
त्रिवेंद्रम येथे मणीपुर विरुद्ध विजयासाठी ७३ धावांचा पाठलाग करताना सलामी फलंदाज ईश्वरी सावकारने ३८ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ४६ धावा फटकावत महाराष्ट्र संघाला १० व्या षटकात ९ गडी राखून विजयी केले. रसिका शिंदेनेही आपल्या मध्यमगती गोलंदाजीने मणिपूरचा १ बळी मिळवला.
तर हिमाचल प्रदेश विरुद्ध ६० चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. पण बाकीच्या फलंदाजांची साथ न मिळाल्याने विजयासाठी १२२ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाला ९९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे सदर महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेचे साखळी सामने १० ते २१ डिसेंबर २०२३ दरम्यान त्रिवेंद्रम येथे खेळविले जात आहेत . महाराष्ट्राचे बाकीचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत : १३ डिसेंबर – तामिळनाडू ,१५ डिसेंबर – सिक्कीम, १७ डिसेंबर – झारखंड, १९ डिसेंबर – विदर्भ , २१ डिसेंबर – नागालँड .