इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्तीसगढ, मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांना संधी न देता भाजपने नवीन चेह-याला मुख्यमंत्रीपदीचा संधी दिल्यानंतर सर्वांचे लक्ष राजस्थानमध्ये लागले होते. पण, अखेर येथील तिढा सुटला असून मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने भजनलाल शर्मा. यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्याचप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री राजस्थानमध्ये असणार असून त्यात दीया कुमारी, प्रेमचंद बैरवा यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.
राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी दबाव तंत्रचा वापर केला होता. पण, हा दबाव झुगारुन भाजपने निर्णय़ घेत भजनलाल शर्मा यांचे नाव जाहीर केले. चारवेळा ते संघटनमंत्री होते. गृहमंत्री अमित शाह यांचे जवळचे मानले जातात. भरतपूर येथील ते रहिवासी आहे. पण, त्यांनी जयपूर येथून उमेदवारी देण्यात आली होती. पहिल्यांदाच त्यांनी निवडणूक लढवली व ते जिंकले.
चार राज्याच्या निवडणुकाचे निकाल जवळपास स्पष्ट झाल्यानंतर राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली होती. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी आपली ताकद पणाला लावली होती. भाजपने १९९ जागापैकी ११४ जागेवर आघाडी घेतली. त्यामुळे बहुमतांच्या आकड्यापेक्षा या जास्त जागा झाल्या. मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधीया, जयपुर राजघराण्यातील दीया कुमारी, खासदार बालकनाथ, व राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांचे नावे चर्चेत होते. पण, भाजपने येथे पुन्हा धक्का देत भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली आहे.