नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील ढासळलेल्या आरोग्यव्यवस्थेवर विरोधकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज स्टेटोस्कोप, मास्क घालून आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केले. जनतेचं आरोग्य खराब करणाऱ्या सरकारचा आज स्टेथोस्कोप घेऊन तपासणी करण्याची वेळ आज आली आहे असे सांगत हे आंदोलन करण्यात आले.
काल कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन केले तर आज आरोग्याच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्यासाठी आंदोलन केले. विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांकडून रोज एक प्रश्न घेऊन आंदोलन केले जात आहे. त्यानंतर सरकारला सभागृहातही घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षही त्याला उत्तर देत आहे.
या अधिवेशनात अनेक विधेयक पास झाली तर राज्यातील विविध विषयांवर चर्चा घडत असली तरी विरोधकांचा विरोध काहीसा सौम्य बघायला मिळत आहे. यावेळेस विविध प्रश्नांवर मात्र चर्चा होत असून त्यात विऱोधक मात्र प्रश्न मांडत आहे.