नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाहन चालवतांना जशी काळजी घ्यायची असते तशीच काळजी ती थांबल्यानंतर घेणे गरजेचे आहे. अशीच काळजी न घेतल्यामुळे एका कंटनेर चालकाला चांगलेच महागात पडले. न्यूटलवर कंटेनर ठेऊन तो ढाब्यावर आंघोळीसाठी खाली उतरला व त्यानंतर काही क्षणातच कंटनेरची त्याला धडक बसली. ही घटना मुंबई- आग्रा महामार्गावर पाडळी फाट्याजवळ झाली. यात कंटनेर चालक जखमी झाला आहे.
मंगळवारी सकाळी ८.२० वाजता पाडळी फाट्याजवळ एका ढाब्यावर कंटेनर न्यूटलवर ठेऊन कंटेनर चालक दिपक कुमार सरोज (२८) प्रतापगड (उत्तर प्रदेश) उतरला. त्यानंतर कंटनेरने त्याला मागून धडक दिली. कोणतेही वाहन हे थांबवल्यानंतर त्याला गिअरमध्ये टाकून त्यानंतर हॅण्ड ब्रेक लावला जातो. पण, याठिकाणी ही काळजी चालकाने घेतली नाही. त्यामुळे ही चूक त्याला चांगलीच महागात पडली. कंटेनर ही महाराष्ट्राातील असून तीचा नंबर MH.46.BF.3988 हा आहे.
या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली. या रुगणवाहिकेतून जखमी चालकाला नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.