बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या तीन महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची आवश्यक ती तपासणी करण्यात येत आहे.
सोमवारी बीड जिल्ह्यातील अंबासाखर कारखाना (वाघाळा) येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होती. या सभेतच त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर ते स्टेजवर बसले. त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी अर्ध्यातच भाषण थांबवले. त्यानंतर त्यांना अंबेजोगाई येथील थोरात रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या तपासण्या करुन सलाईन लावण्यात आली.
जालन्यातील आमदर उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळेस त्यांना तीन महिने आराम करण्याचा सल्ला डॅाक्टरांनी दिला होता. पण, पाटील यांनी राज्यभर सभा सुरु ठेऊन धडाका लावला. पण, आज अशक्तपाणा जाणवल्यामुळे त्यांनी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठिक आहे.
https://www.facebook.com/plugins/video.php?