नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हौशी रोप स्किपींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा भारती नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने रोप स्किपींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने नाशिकच्या पंचवटी येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेत संपूर्ण भारतातील २० राज्यांचे एकूण ८०० खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत सर्वाधिक १८० गुणांसह हरियाना संघाने प्रथम क्रमांक तर १४० गुणांसह दिल्ली संघ द्वितीय स्थानी राहिला, तर एकूण १२८ गुणांसह मध्यप्रदेश संघ तृतीय स्थानी राहिला. मुलींच्या गटात सर्वाधिक १६० गुणांसह दिल्ली संघाने प्रथम क्रमांक तर १४८ गुणांसह हरियाना संघ द्वितीय स्थानी राहिला, तर एकूण १३२ गुणांसह मध्यप्रदेश संघ तृतीय स्थानी राहिला. या स्पर्धेत ११वर्षे, १४वर्षे, १७ वर्षे मुले आणि मुली आणि वरिष्ठ गट पुरुष – महिला अश्या चार गटांचा समावेश होता.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र हौशी रोप स्किपींग असोसिएशनचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पवार यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी,भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत जाधव ,अमित घुगे, विजय बनछोडे, नाशिक जिल्हा रोप स्किपींग असोसिएशनचे अध्यक्ष शाम बडोदे, रोप स्किपींग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव निर्देश शर्मा, सुनिल निरगुडे, दत्ता वाघे, – क्रीडा भारती नाशिकचे अध्ययक्ष विनोद शिरभाते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के.के.आहिरे यांनी केले, प्रास्ताविक संजय पाटील सचिव हौशी रोप स्किपींग असोसिएशन महाराष्ट्र यांनी केले.आभार प्रदर्शन पावन खोडे यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हौशी रोप स्किपींग असोसिएशन महाराष्ट्र चे सरचिटणीस संजय पाटील, क्रीडा भारती नाशिक चे अध्यक्ष विनोद शिरभाते, विजय बनसोडे, राकेश पाटील, स्वप्नील करपे, सुरेखा पाटील, शैलजा जैन यांचे मार्गदर्शनाखाली जयश्री भुसारे, क्षितिजा खटावकर, प्रज्ञा पात्रीकर, कामिनी केवट, चारुलता सूर्यवंशी, मंजिरी पाटे, रश्मी पराते, साक्षी खोडे, अनुष्का पगारे , अक्षदा शिंदे, गीता चित्ते, पृथ्वी लोखंडे, चंद्रकांत भाग्यवंत, शार्दुल सर, हिरामण शिंदे, जे. पी. पवार, शंकर आहिरे, अमोल पवार, अमोल जाधव, बाळासाहेब रणशूर, सुनिल दवंगे, पवन खोडे ,अभिजित देशमुख, युवराज शेलार, विनोद वाणी, गणेश ढेमसे, मोहम्मद कैफ, भावेश नांद्रे, रोहित भामरे, तेजस मोरे, आनंद ठाकूर, साहिल जाधव, रोहित जगताप, हितेश सोनावणे, ऋषिकेश डावरे, हर्षित परदेशी, नचिकेत सैंदाणे, आशिष पाटे, कल्पेश शिंदे, विवेक सोनावणे, वाजाहाद अली आदीनी परिश्रम घेतले. .