नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर मारूती स्विफ्ट कारमध्ये १२ किलो ०८४ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा माल एका प्लास्टीक गोणी मध्ये भरलेला पोलिसांना मिळाला. गुन्हेशाखा युनिट ०१ ला एमएच १५ सी. डी.०३१७ या कारमध्ये गांजा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणात राहुल राज पवार रा. पंचवटी नाशिक यास पहिले ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी या कारवाईत मारूती स्विफ्ट डिझायर कार, ३ मोबाईल फोन असा एकुण ६ लाख ३० हजाराचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदरचा माल पवार याने सर्जेराव फकीरा गायकवाड रा. हिरावाडी, पंचवटी, नाशिक याचे कडून विकत घेतला असल्याचे माहिती मिळाली. सदर गुन्हयात या दोघांना अटक करण्यात आली आहे. म्हसरूळ पोलीस ठाणेस एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २०(ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि हेमंत तोडकर हे करीत आहे.
सदरची कामगिरी संदिप कर्णीक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सपोनि हॅमत तोडकर, पोउपनिरी विष्णु उगले, चेतन श्रीवंत, सपोउनि रविंद्र बागुल, पो. हवा प्रदिप म्हसदे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल काठे, शरद सोनवणे, प्रविण वाघमारे, नाझीमखान पठाण, पो.ना प्रशांत मरकड, विशाल देवरे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, चालक सपोउनि. किरण शिरसाठ अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे.