नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे काय फायदा झाला याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
ईबीपी कार्यक्रमांतर्गत, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) २०२२-२३ दरम्यान इथेनॉल मिश्रणामुळे अंदाजे ५०९ कोटी लिटर पेट्रोलची बचत केली आहे. त्यामुळे २४ हजार ३०० कोटी परकीय चलनाची बचत झाली असून, शेतकऱ्यांना १९ हजार ३०० कोटी मिळाले आहेत, परिणामी कृषी क्षेत्राला चालना मिळाली आहे. सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमांतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाला प्रोत्साहन देत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे, देशांतर्गत कृषी क्षेत्राला चालना देणे आणि संबंधित पर्यावरणीय लाभ, यासारखी अनेक उद्दिष्टे यामागे आहेत.
ईबीपी अंतर्गत इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी, सरकारने व्याज माफी योजने अंतर्गत एकूण १२१२ प्रकल्पांना मंजुरी दिली असून, यामध्ये ५९० मोलासेस आधारित, ४७४ धान्य-आधारित आणि १४८ दुहेरी फीड आधारित प्रकल्पांचा समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.