नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १ ऑक्टोबर २०२५ पासून निर्मित एन २ आणि एन ३ श्रेणीच्या मोटर वाहनांच्या केबिन्समध्ये वातानुकूलन यंत्रणा स्थापित करणे बंधनकारक करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ८ डिसेंबर २०२३ रोजी एक अधिसूचना जारी केली आहे.
N2 वाहने ही मध्यम आकाराची व्यावसायिक वाहने आहेत, ज्यांचे वजन जास्तीत जास्त 12 टन आहे. या वर्गात पॅनल व्हॅन आणि छोट्या टेम्पोचा समावेश आहे. N3 वाहने ही मोठी व्यावसायिक वाहने आहेत, ज्यांचे वजन जास्तीत जास्त 16 टनांपर्यंत आहे. या वर्गात ट्रक आणि बसचा समावेश आहे. या वाहनांची वातानुकूलन यंत्रणेसह स्थापित केबिनची चाचणी, वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या IS 14618: 2022,नुसार होईल.
अधिसूचनेनुसार १ ऑक्टोबर, २०२५ रोजी किंवा नंतर एन २ आणि एन ३ श्रेणीचे कोणतेही ड्राइव-अवे चेसिस (अपूर्ण स्वरूपातील इंजिन क्षमता २५ सीसी असलेले वाहन ) स्वरूपात उत्पादित केलेल्या वाहनात, उत्पादक IS 14618:2022 नुसार वातानुकूलन प्रणालीचा मंजूर संचाचा प्रकार पुरवेल. मंत्रालयाने १० जुलै 2023 रोजी मसुदा अधिसूचना जारी करून संबंधितांकडून सूचना मागवल्या होत्या.
अशी आहे केंद्र सरकारची अधिसूचना