मंगळवार, ऑगस्ट 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माहेरून ५० लाख रूपये आणावेत यासाठी विवाहीतेचा छळ…पतीसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

by Gautam Sancheti
डिसेंबर 11, 2023 | 5:52 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 2


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माहेरून ५० लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने मागणी पूर्ण न केल्याने चारित्र्याचा संशय घेवून पतीने तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनगर पोलिस ठाणे हद्दीत राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पती अभिलाष विसपूते व सासरच्या सात जणांनी गेल्या वर्षी महिलेने माहेरून ५० लाख रूपये आणावेत अशी मागणी केली होती. विवाहीतेने पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला वारंवार शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण करण्यात आली. तसेच पतीने चारित्र्यावर संशय घेवून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

आर्थिक वादातून बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आर्थिक वादातून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना चौकमंडई भागात घडली. या घटनेत धारदार हत्यार व फायटरने मारहाण करण्यात आल्याने सदर इसम जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकार शेख,सोहेल शेख व आफताब अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत इम्रान नजिर शेख (३६ रा.आशियाना पार्क वडाळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. इम्रान शेख शुक्रवारी (दि.८) रात्री चौकमंडईत गेले होते. साधना हॉटेल भागात संशयित त्यास भेटले. यावेळी हात उसनवार दिलेल्या पैश्यांची मागणी केल्याने ही घटना घडली. शेख यांनी पैस्यांची मागणी केल्याने संशयित त्रिकुटाने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत फायटर आणि धारदार हत्याराचा वापर करण्यात आल्याने शेख जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक धाबळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

माजी महापौर दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न….लोकसभा निवडणूक लढवण्याची केली घोषणा

Next Post

या तारखेपासून मोठया माल वाहतूक वाहनांच्या कॅबिनमध्ये एसी बसवणे बंधनकारक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 92

या तारखेपासून मोठया माल वाहतूक वाहनांच्या कॅबिनमध्ये एसी बसवणे बंधनकारक

ताज्या बातम्या

image002JAHI e1754963003729

मोठी भेट…३५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्‍ये ३ हजार ९०० कोटी रुपये या कारणासाठी जमा

ऑगस्ट 12, 2025
IMG 20250811 WA0508 1

नाशिकमध्ये महिंद्रा नवीन मेगा प्रकल्प उभारणार….मंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांची निमात घोषणा

ऑगस्ट 12, 2025
Indian Flag

स्वातंत्र्यदिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता…राजशिष्टाचार विभागाकडून हे निर्देश जारी

ऑगस्ट 12, 2025
Untitled 14

नाशिक जिल्हा ग्रामविकास प्रमुख भीमराम गारे यांचे निधन…पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या मोठया व्यक्तींबरोबर केले संघाचे प्रचारक म्हणून कार्य

ऑगस्ट 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रांरीकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या, मंगळवार, १२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 11, 2025
trump 1

अमेरिकेने लावलेले आयात शुल्क व कापड निर्यात धोरण व सद्यस्थिती नेमकी काय आहे…

ऑगस्ट 11, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011