नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नाशिक मनपा प्रशासनावर वचक निर्माण करणारे कर्तव्यदक्ष माजी महापौर दशरथ आप्पा पाटील यांचा वाढदिवस रविवारी शहर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमातच लोकसभा निवडणूक लढवण्याचा दशरथ पाटील यांनी शंखनाद केला.
नाशिक मनपा प्रशासनावर वचक निर्माण करून आपल्या आपल्या कार्यशैलीतून नाशिक शहराचा चौफेर विकास साधणारे माजी महापौर दशरथ आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. या वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी सोमेश्वर येथील महादेव मंदिरात दुग्ध अभिषेक करण्यात आला. तसेच हनुमान मंदिरात आरती करून शंख नाद करण्यात आला. यावेळी सामाजिक राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
याचबरोबर सातपूर जलतरण तलाव येथे जिल्हा स्थरिय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्रेम पाटील महापालिकेचे निवृत्त अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत ३०० च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्यांना माजी महापौर दशरथ पाटील यांच्या हस्ते सायकल व भरघोस बक्षिसे वाटप करण्यात आले. यावेळी श्रीहरी सोनकांबळे, विनय निंबाळते, विकास भडांगे, घनश्याम कुवर, शंकर पाटील, संजय पाटील, अनिल शिल्पा देशमुख, सविता शिंदे, माया जगताप आदी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त श्रीकृष्ण मंदिर शिवाजीनगर येथे सायंकाळी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण मंदिरात पुष्पहार अर्पण करून तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सिन्नर येथील शाहीर स्वप्निल ठोंबरे यांच्या शिवगर्जना या शाहिरीच्या कार्यक्रमाच आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध पोवाडे सादर केले.
या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त संदेश दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिकच्या राजकारणात वेगळी दिशा देण्यासाठी तसेच शहर आणि जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी येणाऱ्या २०२४ ची लोकसभा निवडणूक लढणार सुतवाच या निमित्ताने दशरथ पाटील यांनी केले. यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी अनेकांचा समाचार घेतला. यावेळी महाराष्ट्र बागायतदार संघांचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दशरथ अप्पा पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी दशरथ आप्पा पाटील यांना शुभेच्छ देण्यासाठी शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केल्याचं यावेळी पाहायला मिळाल या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ वकील बाळासाहेब वाजे, माजी सभापती माणिक तात्या बोरस्ते, महाराष्ट्र बागायतदार संघांचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले, प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर गोडसे, माजी उद्यान निरीक्षक वसंतराव मोगल, माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील, युवा उद्योजक प्रेम पाटील, माजी सरपंच पी. के. जाधव, उद्योजक दिलीप गिरासे, डॉ. प्रितेश मोगल, माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर, समाजसेविका सविता गायकर, भागुजी पाटील, निवृत्ती पाटील, प्रकाश पाटील, सुभाष घोलप, अभिजित गोधडे, जितू केदार, शंकर पाटील, नितीन पाटील, रोहित पाटील आणि हरिपाठ मित्र मंडळ गंगापूर गांव आणि शिवाजीनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..