इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मध्य प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मोहन यादव हे तिस-यांदा उज्जैन दक्षिण विधानसभा मतदार संघातून तिस-यांदा निवडून आले आहे. २०२० ते २०२३ पर्यंत ते शिक्षणमंत्री होते. नरेंद्रसिहं तोमरला विधान सभा अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यप्रदेशमध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार असून त्यात राजेश शुक्ल व जगदीश देवडा यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
छत्तीसगडनंतर मध्यप्रदेशमध्ये नवीन मुख्यमंत्री निवडला गेला आहे. मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना डावलून नव्या चेह-याला संधी देणे केंद्रीय स्तरावर ठरले होते. पण, तो निर्णय घेणे भाजपसाठी सोपा नव्हता. पण, भाजपने हा निर्णय घेतला. शिवराजसिंह चौहान यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केली.
भाजपने मध्य प्रदेशमध्य २३० जागापैकी १६३ जागेवर विजय मिळवला. सुरुवातील भाजपचा या राज्यात पराभव होईल असे बोलले जात होते. पण, भाजपने सर्वाधिक जागा जिंकत मोठा धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मुख्यमंत्री शिवाराजसिंह यांच्या कामावर भाजपने ही कामगिरी केल्याचे बोलले जात आहे. पण, शिवराजसिंह यांना मात्र भाजपने संधी दिली नाही. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, के लक्ष्मण, आशा लाक्रा यांना पक्षाने निरीक्षक म्हणून पाठवले होते. त्यांनी आज सर्व आमदारांची बैठक घेतली त्यात हा निर्णय घेण्यात आला.
असे मिळाले यश
भाजपने जाहीर केलेल्या लाडली लक्ष्मी योजना, लाडली बहना योजनेची जादू या ठिकाणी चालल्याचे चित्र आहे. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिराज सिंधीया यांनी भाजपमध्ये केलेला पक्षप्रवेशही काँग्रेसचा झटका देऊन गेला तर भाजपला त्याचा फायदा झाला आहे. २०१८ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते. पण, काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर हे सरकार पडले. त्यामुळे जनता पुन्हा काँग्रेसला साथ देईल असे बोलले जात होते. पण, या निवडणुकीत मतदारांनी भाजपला साथ दिली. मतमोजणीच्या कलानुसार ५० टक्के महिला भाजपबरोबर असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आखलेली रणनिती येथे काम करुन गेली. या निवडणुकीत काँग्रेसनेही मोठे आश्वासन दिले. पण, जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.