इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चार महिन्यानंतर पाकिस्तानहून आलेली अंजू बरोबर पती अरविंद यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता आहे. या दोघांनी एकत्र बसून चर्चा केल्यानंतर अंजूची मुलगी तीला भेटायला हरिणायाणातील सोनीपत येथे पोहचली आहे. या संपूर्ण प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. त्यामुळे भारतीय पती अरविंदने भिवाडी येथे दाखल केलेली तक्रार मागे घेण्याची शक्यता आहे. अरविंदने बच्चे जैसा कहेंगे वैसा ही होगा असे सांगितल्यामुळे या प्रकरणात वाद मिटण्याची शक्यता आहे. याअगोदर अरविंद व मुलांनी सुध्दा आईला भेटायला नकार दिला होता. पण, आता भेट झाल्यामुळे या प्रकरणातील ट्विस्ट का आला हे अद्याप समोर आलेले नाही.
अंजू पाकिस्तानाहून आल्यानंतर सात दिवसापासून अगोदर बेपत्ता होती. ती पती व वडीलांकडे नसल्यामुळे ती कोठे आहे याच शोध घेतला जात होता. २९ नोव्हेंबरला ती भारतात परत आली. ३० नोव्हेंबर तीचे शेवटचे लोकेशन दिल्ली होते. त्यानंतर ७ दिवसानंतर ती राजस्थानच्या अलवर जिल्हयातील भिवडी पोलिस स्टेशनमध्ये दिसली. या ठिकाणी तीची चौकशी करण्यात आली. या पोलिस स्थानकात पती अरविंद याने तक्रार दिली असून त्यात अंजू व पाकिस्तानी पती नसरुल्लाह नावे आहेत.
पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली असली तरी तिच्या समस्या वाढलेल्या होत्या. तीने मुलांना भेटायला आल्याचे सांगितले. पण, त्यानंतर अंजूचा पाकिस्तानी पती नसरुल्लाह यांनी त्यामागील खरं कारण सांगितले होते. तो म्हणाला की, अंजूची व्हिसाची मुदत संपली होती. वारंवार विनंती करुनही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तो वाढवला नाही. ती महिन्याभरापासून व्हिसाशिवाय पाकिस्तानात राहत होती. अंजूचा व्हिसा १ वर्षासाठी वाढवला असता तर बरे झाले असे त्याने मीडियाशी बोलतांना सांगितले.
असे गाठले पाकिस्तान
विवाहित असलेली अंजू पाकिस्तानच्या युवकाच्या प्रेमात पडल्यानंतर तीने पाकिस्तान गाठले होते. त्यामुळे देशभर या प्रेमाची चर्चा झाली होती. पाकिस्तानमध्ये ती चार महिने राहिली. त्यानंतर आता ती परतली आहे. पाकिस्तानात जाऊन तिथल्या प्रियकराशी लग्न केलेली अंजू परत पाकिस्तानात जाणार, की नाही याबाबत अनिश्चितता होती. पण, त्यानंतर खरं कारण समोर आल्यामुळे आता पाकिस्तानमध्ये पण तिला नो इंन्ट्री आहे.
राजस्थानमधील भिवडीत भारतीय पती
अंजू पती अरविंद आणि दोन मुलांसह राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे राहत होती. ती टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला गेली होती; पण नंतर ती खैबर पख्तुनख्वा येथे राहणाऱ्या नसरुल्लाशी तिने लग्नही केले. अंजू आणि नसरुल्लाह यांच्या लग्नाचे फोटोही समोर आले होते.
अंजू एका ऑटोमोबाइल कंपनीत काम करत होती, तर तिचा नवरा अरविंद इंडो कंपनीत कामाला होता. अंजूचे पती अरविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील बलियाचे आहे. अंजूचे कुटुंब मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे आहे.
पुन्हा दिसली
अंजू आणि अरविंद यांचा विवाह २००७ साली झाला. अरविंदचा धर्म ख्रिश्चन आहे, तर अंजू हिंदू आहे. अंजूने लग्नानंतर धर्म बदलला होता. अंजूची मुले अरविंदसोबत आहेत आणि अंजूला भेटू देणार नाही असे त्याने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यानंतर मुलांनी सुध्दा आईला भेटायला नकार दिला होता. पण, आता मुलगी भेटायला गेली आहे. तर पती अरविंदनेही नरमाईने हा प्रश्न हाताळण्याचे संकेत दिले आहे.