मुबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. त्यांनी शहाणे व्हावे, अन्यथा त्यांना उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील तुम्ही चुकताय! आपण आत्ता राजकीय भाषा करायल लागलात!…लेकरू लेकरू म्हणत, आता राजकीय ढेकरू द्यायला सुरू केलं आहे. जरांगे पाटील आपणाला मी सांगितलं होतं की राजकीय भाष्य करू नका! आणि आदरणीय देवेंद्र जींवर तर बिलकुल भाष्य करू नका! असे म्हटले आहे.
जरांगे पाटील लातूर, धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. मराठा समाजाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला; मात्र त्यांनी फडणवीस आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की कामातून गेलेला माणूस लवकरच गोळ्या सुरू कराव्यात. मराठ्यांचा शिंदे यांच्यावर विश्वास आहे. जे अधिकारी कुणबी मराठाच्या नोंदी जाणूनबुजून सापडू देत नसतील, ते कामापासून दूर होतील. कितीही ढोल वाजवत बसले, तरी आरक्षण मिळणारच. फडणवीसांनी आताच शहाणे व्हावे नाही, तर मी सगळे बाहेर काढणार. मीच घडवून आणतोय हे त्यांनी उघडपणे सांगावे. त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. आता खोड्या करायला सुरुवात केली आहे, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
या टिकेनंतर आता भाजपकडून उत्तर येऊ लागले आहे. प्रसाद लाड यांच्याअगोदर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुध्दा टीका केली. त्यानंतर लाड समोर आले.