इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः पोलिसांनी विरार परिसरात एका बांगला देशी नागरिकाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कथित सेक्स-रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्याचे नेटवर्क मुंबई आणि भारताच्या इतर भागांमध्ये पसरले आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह तीन बांगला देशी मुलींची सुटका केली आहे.
अर्नाळा, विरार येथे अशोक हरणू दास (५४) नावाचा बांगला देशी नागरिक बांगला देशातून बेकायदेशीरपणे आणलेल्या तीन महिलांसोबत आपल्या घरात सेक्स-रॅकेट चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवून त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. दलाल अटक पकडल्यानंतर दासने पोलिसांना दिलेली कबुली धक्कादायक अशी आहे.
दास याने सांगितले की, त्याने सुमारे २००-२५० मुलींना सापळ्यात अडकवून त्यांची विक्री केली. दक्षिण मुंबईतील ग्रँट रोडच्या रेड-लाइट एरियामध्येही तो त्यांना पाठवत होता. पोलिस अधिकारी संतोष चौधरी आणि एका स्वयंसेवी संस्थेचे लोक बनावट ग्राहक म्हणून त्याच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचले आणि करार निश्चित झाल्यानंतर, पथकाने म्हाडा कॉलनी, इमारत क्रमांक ७ मधील दास यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. पोलिसांनी दासला अटक केली आणि त्याच्या तावडीतून १७ वर्षीय मुलीसह तीन बांगला देशी मुलींची सुटका केली.