नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ सीमाताई महेश हिरे आयोजित खान्देश महोत्सवात दिल्या जाणा-या खान्देश रत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यावर्षी २४ डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जाणार तसेच २५ डिसेंबर रोजी सुप्रसिध्द गायक पद्मश्री कैलास खेर यांचा लाईव्ह कॉन्सेंट होणार असल्याची माहिती आमदार सीमाताई हिरे, रश्मी हिरे-बेंडाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्हातील नाशिक शहरात स्थायिक झालेल्या नागरीकांना एकत्रित आणणे व खान्देशची संस्कृती, परंपरा, उत्सव, जीवन पध्दती, सण, उत्सव साजरा करण्याची पध्दती याची ओळख नाशिक शहर जिल्हा वासियांना होण्यासाठी हा नाशिककरांचा खान्देश महोत्सव गेल्या काही वर्षापासुन आयोजित केला जातो आहे. चार दिवस चालणा-या या महोत्सवात कवी संमेलन, जेष्ठोत्सव न्यु होम मिनिस्टर, इंटर स्कुल डान्स कॉम्पीटीशन, महिला भजन स्पर्धा व हस्या जत्रा या कार्यक्रमातील विनोदविरांचा करमणुक कार्यक्रम असे भरगच्च नियोजन याही वर्षी २२ ते २५ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
या महोत्सवा दरम्यान खान्देशात जन्मलेल्या व आपआपल्या कार्यकर्तुत्वाने विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवुन सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या शिवाय आपल्या मातीशी व माणसांशी नाळ जोडून ठेवलेल्या विभुतींना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची अगळीवेगळी पंरपरा सुरु करण्यात आली आहे. गेल्या काहीवर्षीही अशा मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होत.
खान्देश महोत्सव २०२३ खालील प्रमाणे कार्यक्रमाचे स्वरुपः दिनांक २२ डिसेंबर सकाळी १० वाजता खान्देश महोत्सव उद्घाटन शुभारंभ दुपारी १२ वा. मराठी साहित्य व अहिराणी कवी सम्मेलन, साय. ७ वा खान्देशी बॅण्ड व कानबाई गाणे. त्यानंतर २३ डिसेंबर सकाळी १० वा इंटरस्कुल कल्चरल डॉन्स कॉम्पीटीशन साय. ७ वा महिलांसाठी न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सादरकर्ते क्रांती नाना मळेगांवकर हे करणार आहे.
दिनांक २४ डिसेंबर सकाळी १० वा महिला सांस्कृतीक नृत्यस्पर्धा सायं. ७ वा फूल २ धमाल महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम श्याम राजपूत, विनिता खरात, राहित माने, गौरव मोरे, प्रभाकर मोरे, शिवाली परब,माधुरी पवार लावणी क्वीन व खान्देश रत्न पुरस्कार सोहळा आहे. दिनांक २५ डिसेंबर सकाळी १० वा पुणे मावळा प्रस्तुत रणांगण खेळ साय ७ वा पद्मश्री कैलास खेर लाईव्ह कॉन्सेट होणार आहे.