चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी घातल्याने शेतकऱ्यानं मध्ये प्रचंड असंतोष पसरला असून केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवावी या मागणी साठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर हे चांदवड येथून केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या नाशिक येथील निवासस्थानी डेरा आंदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांसह मोटारसायकल रॅली द्वारे निघाले आहे.
केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदी केल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला, केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय मंत्री डॉ भरती पवार यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्र सरकार पर्यंत मांडून त्वरित कांद्यावरील निर्यात बंदी उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी प्रहार संघटने तर्फे हे डेरा आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनाची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी दिली. गेल्या काही दिवसात कांदा निर्यात बंदीवरुन जिल्ह्यात जोरदार आंदोलन सुरुआहे. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे रास्ता रोको करणार आहे. त्याअगोदर आज प्रहारचे डेरा आंदोलन आहे.