इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर असल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. प्रकृत्ती अस्वस्थेमुळे ते आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण, गेल्या काही दिवसापासून ते नाराज असलेल्या चर्चा मात्र पुन्हा रंगू लागल्या.
अजित पवार सत्तेत आल्यापासून कायमच चर्चेत आहेत. त्यांना कोणते खाते मिळणार येथून त्यांच्याबाबत सुरू झालेली चर्चा अजून संपलेली नाही. दरम्यानच्या काळात अजित पवार मुख्यमंत्री शिंदे यांच्या अधिकारांवर गदा आणत असल्याची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीतून अजित पवारांनी वेगळे होत भाजपसह सत्तेत सहभाग घेतला. अशात गेल्या काही दिवसापासून ते महायुतीव नाराज असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवारांनी गणपती दर्शनावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी हजेरी लावली होती. तसेच बाप्पाचे दर्शन घेतले होते. चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात शाब्दीक चकमक रंगली होती. त्यानंतर आता अजितदादा महायुतीमध्ये नाखुश असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री सागर बंगल्यावर गेले त्यावेळी तेथे देवेंद्र फडणवीसांशी त्यांची बराच वेळ चर्चा सुरू होती. याच दिवशी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचेही दर्शन घेणार होते. मात्र चर्चा बरीच वाढल्याने वर्षावर जाणे आयत्यावेळी रद्द करावे लागले असे नंतर सांगण्यात आले. शुक्रवारी मात्र ओबीच्या समाजाच्या बैठकीत ते मुख्यमंत्रीबरोबर दिसले. त्यानंतर पुन्हा रात्री झालेल्या एका बैठकीला ते मुख्यमंत्र्याबरोबर होते. पण, आज पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.