सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंदापुरला भुजबळांचा एल्गार…. आमचा विरोध झुंडशाहीला आणि दादागिरीला

by Gautam Sancheti
डिसेंबर 9, 2023 | 7:11 pm
in राज्य
0
IMG 20231209 WA0316 2

इंदापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, आम्ही एवढंच मागतोय. परंतु कुणी दादागिरीची भाषा करत असेल तर आम्ही देखील दादागिरीने उत्तर देऊ असे सांगत मंडलच्यावेळी देखील सर्व एकत्र येऊन लढले होते. आताही ओबीसींच आरक्षण वाचविण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी पुढं यायला हवं असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केल.

आज इंदापूर येथे राज्यभरातील ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत भटके विमुक्त ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास बहुसंख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.

यावेळी प्रकाश शेंडगे, माजी मंत्री आ.महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, भटक्या विमुक्तांचे नेते प्रा.लक्ष्मण गायकवाड, मुस्लिम ओबीसी संघाचे शब्बीर अन्सारी, प्रा.टी.पी.मुंडे, आगरी नेते प्रा राजाराम पाटील,माजी खासदार समीर भुजबळ,रामोशी समाजाचे नेते दौलत शितोळे, इतर मगासवर्ग अयोजाचे माजी सदस्य प्रा .लक्ष्मण हाके, नाभिक समाजाचे नेते कल्याण दळे, आयोजक अॅड.कृष्णाजी यादव, पांडुरंग शिंदे, यांच्यासह सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाज व इंदापूर येथील पदाधिकारी व ओबीसी बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काम करतोय असे लोक म्हणतात. त्यांना सांगायचं आहे की, त्यांच्या पंधरा सभा झाल्यानंतर आम्ही ‘सौ सोनार की एक लोहार की’ म्हणून एक सभा घेऊन आमची भुमिका मांडत आहोत. अशावेळी मात्र त्यांना कायद्यात सुट दिली जातेय. त्यांना कायदा वेगळा लावला जातोय त्यावर कुणीही बोलायला तयार नाही. त्यांना कायद्याची सुट आणि आम्हाला मात्र कायदा लावला जातोय अस दिसतंय. त्यामुळे राज्यात अशांतता कोण निर्माण करतंय याचा सर्वांनी अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राहता तालुक्यात मतदानाचा राग मनात ठेऊन दलित कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागे असाच प्रकार तुळशी गावात नाभिक समाजाच्या बाबतीत झाला राज्यात नेमकं चाललंय काय ? या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही ? कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची ? असा सवाल उपस्थित केला. तसेच राज्यात अनेक पोलीस आंदोलनात जखमी झाले मग या राज्यात अशांतता निर्माण कोण करतोय ? असा सवाल उपस्थित करत दादागिरीला दादागिरीने उत्तर दिलं जाईल असा इशारा देत पोलिसांवरील हल्ले थांबवा त्यांच्या भडकावू भाषणांना थांबवा अन्यथा जशाच तसं उत्तर आम्हीही देऊ शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, तुमचा हिशोब करू अशी भाषा केली जाते आहे. अशावेळी राज्यातील मराठे नेते गप्प का बसले आहे. ते सत्य परिस्थिती का मांडत नाहीत ? मराठा समाजातील मोठे मोठे नेते का बोलायला तयार नाही ? त्यांना कसली भीती वाटतेय ? निवडणुकीतील मतांची वाटते आहे का ? मतासाठी घाबरता आहे का ? असा सवाल करत त्यांच्या कडे २० टक्के मत असतील तर आमच्या कडे ८० टक्के मते आहे याचा विचार करावा. तसेच सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असे म्हटलं जाते आहे. सर्वांना कुणबी प्रमाणपत्र दिले तर मराठा समाज राहणार नाही असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, समाजातील वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याण्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही हे त्यांना कोण सांगणार अशी टीका त्यांनी केली. ओबीसी समाजातील अनेक जातींमधील अतिमागास जातींना वेगळ आरक्षण दिल आहे. आता केवळ १७ टक्के आरक्षण शिल्लक असून त्यात ३७५ हून अधिक जातींचा समावेश आहे. त्यामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका आम्ही एवढंच मागतोय. मराठा समाजाला विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातोय. त्याला आमचा कुठलाही विरोध नाही. मात्र त्यांना जे दिल जातंय ते ओबीसींना द्या एवढीच आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, या राज्यात गावबंदी सगळ्यांना आहे. मात्र एक विशिष्ट पक्षाच्या लोकांना गाव बंदी नाही हा कुठला प्रकार आहे. अद्यापही गावबंदीचे बोर्ड हटवले जात नाही. जे त्या विरुद्ध बोलता आहे त्यांना मारल जातंय….आमच्या लोकांनी काही बोललं तर पोलीस कारवाई करणार… मात्र त्यांनी काहीही केलं तरी पोलीस काही करणार नाही हा कुठला कायदा आहे. संयमाचा अंत पाहू नका त्यांचा क्रोध वाढला तर त्यांच्या क्रोधाला कुणी आळा घालू शकत नाही. त्यामुळे शासन आणि पोलीस यंत्रणेने वेळीस यावर लक्ष दिल पाहिजे असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं. तेथील शेतकऱ्यांनी मला फोन केला की तुम्ही बघायला या. त्यावेळी मी पाहणीस गेलो. तीन लाखांच्या मतदारसंघात तीस लोक गो बॅक चे बोर्ड घेऊन पुढे आले. अगदी सगळ्या ठिकाणी तेच होते. त्यानंतर मी ज्या रस्त्यांनी गेलो ते रस्ते आम्ही शुद्र आहोत म्हणून गोमुत्र टाकून साफ केलं. मग आम्ही जर शुद्र असू तर प्रमाणपत्र घेऊन शुद्र का होताय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच बिहार सारखे राज्य जातनिहाय जनगणना करू शकते मग महाराष्ट्र का करू शकत नाही. महाराष्ट्रात देखील जात निहाय जनगणना करायला हवी. शिंदे आयोगाचे अध्यक्ष न्यामूर्ती शिंदे जी भूमिका घेत आहे त्याला आपला विरोध असून गेल्या दोन महिन्यात देण्यात आलेले कुणबी दाखले रद्द करावे. ओबीसींचा नोकऱ्यामधील अनुशेष भरून काढावा. मराठा समाजाला वेगळ आरक्षण द्याव.ओबीसी आरक्षणाला धक्का लाऊ नये अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला गंगापूररोडवरील स्पीड ब्रेकरवर गाडी आदळली….सिलेंडरचा झाला स्फोट..कारचे मोठे नुकसान (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिकच्या लोकअदालतमध्ये एकाच अपघात प्रकरणात तब्बल १ कोटी २१ लाख रूपयांची तडजोड… एकुण २३२६ प्रकरणे निकाली

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

SEX RACKET
संमिश्र वार्ता

गर्ल्स हॅास्टेलमध्ये सेक्स रॅकेट….१० तरुणींसह ११ जण ताब्यात

सप्टेंबर 8, 2025
bhujbal 11
महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

सप्टेंबर 8, 2025
Untitled 2
महत्त्वाच्या बातम्या

उल्हासनगरमध्ये कलानींचा तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेनेला पाठिंबा…भाजपला धक्का

सप्टेंबर 8, 2025
G0NrBxTWkAALc8P e1757300035808
संमिश्र वार्ता

कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे जाहीर करा…रोहित पवार यांचा सवाल

सप्टेंबर 8, 2025
rain1
संमिश्र वार्ता

आजपासून पुढील पाच दिवस पावसाची उघडीप…त्यानंतर या तारखेपासून पुन्हा पाऊस

सप्टेंबर 8, 2025
541656183 1104530571863252 1386343450728100575 n
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये १६ तास चालली विसर्जन मिरवणूक….२ लाख २६ हजार १७७ मूर्तीचे संकलन

सप्टेंबर 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, जाणून घ्या, सोमवार, ८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
doctor
संमिश्र वार्ता

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

सप्टेंबर 7, 2025
Next Post
IMG 20231209 WA0338 e1702131813483

नाशिकच्या लोकअदालतमध्ये एकाच अपघात प्रकरणात तब्बल १ कोटी २१ लाख रूपयांची तडजोड… एकुण २३२६ प्रकरणे निकाली

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011