सुदर्शन सारडा, नाशिक
नाशिक येथे गंगापूर रोडवरील शांतिनिकेतन चौफुली जवळ ऑक्सिजन सिलेंडर नेणारे वाहन स्पीड ब्रेकर वर आदळल्यामुळे दोन सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे एका खासगी कारसह रिक्षा आणि सिलेंडर नेणाऱ्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. हा अपघात इतका भयानक होता की आजूबाजूच्या सहा ते सात बिल्डिंगच्या रहिवासी राहत असलेल्या घराच्या व फ्लॅटच्या काचा फुटल्या. हाँस्पीटलला लागणारा आँक्सीजन गँस सिलेंडरचा टेम्पोमधून घेऊन जात असतांना ही घटना घडली. या टेम्पोमध्ये तीन सिलेंडर होते. त्यापैकी दोघांचा स्फोट झाला एक सिलेंडर बाहेर पडले.
या घटनेत कोणताही जिवीत हानी नाही पण आजुबाजुच्यां बिल्डींगांचे नुकसान झाले काचा फुटल्यां हादरे बसले. शनिवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. हा अपघामुळे कोठे मोठा स्फोट झाल्याची नागरिकांमध्ये भीती तयार झाली होती. आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना भूकंप झाल्याचे वाटले कारण इतके जोरदार हादरे बसले.
या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी न झाल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी अपघात स्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेत तीन चार मुले जखमी झाली आहे.