इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेडच्या घटने पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर मृत्यून थैमान घातले आहे. शहरातील घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तब्बल १८ जणांच्या मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
या घटनेनंतर येथील डीन संजय राठोड यांनी यामधील बहुतेक मृत्यू झालेले रुग्ण बाहेरून रेफर केलेले असल्याचे सांगितले. औषधाच्या तुटवड्याने किंवा डॉक्टरच्या कमतरतेने, हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी या रुग्णालयात महिन्याकाठी सरासरी ३०० रुग्ण दगावत असतात. दगावलेल्या रुग्णामध्ये बाहेरून खाजगी रुग्णालयात रेफर केलेले व उशिरा दाखल केलेले अधिक रुग्ण असतात असेही ते म्हणाले.
दरम्यान छत्रपती संभाजी नगरच्या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचे यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यातच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली….!