नाशिक (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागातून पाच दुचाकींसह सायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत म्हसरूळ,पंचवटी,मुंबईनाका,सरकारवाडा,नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात या चोरीच्या घटना रोजच होत असून त्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप आहे. या चो-यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे.
पहिली घटना गोदाघाटावर घडली. रणजित सिताराम मोगल (रा.सुकेणे ता.निफाड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मोगल मंगळवारी (दि.५) गोदाघाटावर आले होते. रामकुंड परिसरातील यशवंत महाराज पटांगण येथे त्यांनी आपली प्लॅटीना एमएच १५ एचबी ५२८७ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत.
दुस-या घटनेत पेठरोड भागातील विजय अंबादास महामाने (रा.ओमकार प्राईड सोसा.मेहरधाम) यांची एमएच १५ डीएक्स २४३१ मोटारसायकल गेल्या रविवारी (दि.३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.
तिसरी घटना दिपाली नगर भागात घडली. चंद्रकांत रंगनाथ कांबळे (रा.सुजाता अपा.दिपालीनगर) यांची पॅशन मोटारसायकल एमएच १५ डीएक्स ४२५६ गेल्या शुक्रवारी (दि.१) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत. प्रमोद गोपाळराव गायकवाड (रा.अभ्युदय कॉलनी शहिद सर्कल जवळ) हे गेल्या शुक्रवारी (दि.१) कॉलेजरोड भागात गेले होते. विठ्ठल मंदिर परिसरातील विठ्ठल चरणी अपार्टमेंट भागात लावलेली त्यांची बुलेट एमएच १२ एचडब्ल्यू ६०६२ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत. तर स्वप्निल अशोक अहिरे (रा.नंदन गार्डन,उपनगर) हे बुधवारी नाशिकरोड येथे गेले होते. बसस्टॉप परिसरातील नगरकर एचपी पेट्रोल पंप भागात त्यांनी आपली शाईन मोटारसायकल एमएच १५ एचएल ०७५५ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.
सायकल चोरीची घटना आनंदनगर भागात धडली. याबाबत सुनिल परशुराम खाडे (रा.घाडगेनगर,तरण तलावासमोर,ना.रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. खाडे सोमवारी (दि.४) नाशिकरोड येथील आनंदनगर भागात गेले होते. गृह शोभा सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची सायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक होलगीर करीत आहेत.