नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी एक्सप्रेस पुन्हा सुरु करावी या मागणीसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे रेल्वे प्रवासी संघटने भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा करून गोदावरी एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र खैरे, राहुल शेजवळ, निखिल परदेशी, शुभम आहेर, मंगेश पगारे, समीर चव्हाण हे उपस्थितीत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना निवेदन देण्यात आले.
चाकरमान्यासाठी गोदावरी एक्सप्रेस ही महत्त्वाची रेल्वे आहे. मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक, इगतपुरी या रेल्वे स्थानकावरुन जाणा-या या रेल्वेने अनेक जण नाशिक व मुंबई रोज अपडाऊन करत होते. पण, कोरोना नंतर जवळपास सर्व रेल्वे बंद झाल्या. त्यानंतर हळूहळू पुन्हा या रेल्वे पूर्ववत करण्यात आल्या असल्या तरी गोदावरी एक्सप्रेस मात्र सुरु झाली नाही. मध्यतंरी एक स्पेशल ट्रेन यावेळेत सुरु करण्यात आली. पण, ती बंद झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
ही रेल्वे सुरु व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा करुनही रेल्वेने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे थेट प्रवासी संघटनेचे शिष्टमंडळा रेल्वे मंत्रालायत गेले. येथे त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्याची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. आता यातून काही दिलासा मिळतो की हे एक्सप्रेस बंदच राहते हे महत्त्वाचे ठरणार आहे.