इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय तपास संस्था (एनआयई) ने पुणे, मुंबई, ठाण्यासह देशभरातील ४१ ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. ‘इसिस’च्या पुणे मॉड्युलचा पर्दाफाश केल्यानंतर आता ‘एनआयई ’ ॲक्शन मोडवर आली आहे.
‘इसिस’ शी संबंध असलेल्या दोन दहशतवाद्यांना १८ जुलै रोजी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’ कडे गेला. आज सकाळी पुणे, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी परिसरात ‘एनआयई’ने धाडी टाकल्या. ‘एटीएस’ आणि ‘एनआयई ’ च्या तपासात मिळालेल्या माहितीवरून ‘इसिस’चे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, मीरा भाईंदर, भिवंडीतील पडघ्याबरोबरच कर्नाटकात कारवाई करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात ३९ ठिकाणी छापे मारले. ‘एनआयई’ ने काही जणांना ताब्यात घेतले. पडघ्यात ‘एनआयई’ ची ही पहिलीच कारवाई नाही.
पडघा गावात ‘एनआयए’ने सात-आठ जणांना ताब्यात घेतले आहे. पुण्यातून दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर पडघा गाव ‘एनआयए’च्या रडारवर आले होते. त्या वेळीही महाराष्ट्रन ‘एटीएस’ आणि ‘एनआयई’ने पडघा गावातून दोन -तीन जणांना अटक केली होती. आताही ‘एटीएस’च्या मदतीने ‘एनआयए’ने सात-आठ जणांना अटक केली आहे. पुणे दहशतवादी प्रकरणातील शामिल नाचनला पडघामधूनच अटक करण्यात आली होती.