नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –सिन्नर तालुक्यात अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक करीत असतांना जप्त करण्यात आलेल्या वाहनाची सोमवार, ११ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर लिलावाने विक्री करण्यात येणार आहे. असे सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सिन्नर तालुक्यातील वाळु चोरी विरोधी पथकांनी अवैधरीत्या गौण खनिजांची वाहतुक करीत असतांना नाना बंडू बर्डे, रा. मऱ्हळ बु. तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक यांचे ट्रॅक्टर क्र Ch.No.B 3073570 Eng. NO. E 3080223 व ट्रेलर Ch.No. PSI-123 जप्त केला आहे.या वाहन मालकांविरूद्ध दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
परंतू या वाहनाच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीच्या आदेशातील रक्कम शासनास जमा केली नसल्याने या वाहनाची जाहीर लिलावाद्वारे विक्री करून दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करण्यात येणार असल्याचे ही तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी सांगितले आहे.