नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – पुणे महामार्गावरील बंगाली बाबा दर्गा ते नाशिक सहकारी साखर कारखाना पर्यंतच्या रस्त्याचे बळकटीकरण होणेकामी गेल्या काही महिन्यांपासुन खासदार हेमंत गोडसे यांच्याकडुन सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे. बंगाली बाबा दर्गा ते नाशिक सहकारी साखर कारखाना पर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या ०४ हेड अंतर्गत १० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. बंगाली बाबा दर्गा ते नाशिक सहकारी साखर कारखाना यादरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यानंतर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.
बंगाली बाबा दर्गा ते नाशिक सहकारी साखर कारखाना यादरम्यानच्या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासुन दुराव्यस्था झालेली आहे. सदरचा रस्ता खराब असल्याने शिंदे, पळसे, नानेगाव यासह पंचक्रोशीतील गावातील शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे. सदर रस्ता सुधारणेसाठी येथील ग्रामस्थांकडुन सतत खा. गोडसे यांच्याकडे मागणी होत होती.
याकामासाठी निधी उपलब्ध होणेकामी खा. गोडसे यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा केला होता. खा. गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या ०४ हेड अंतर्गत १० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या काही महिन्यात प्रशासकीय बाबी पुर्ण करून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.